जर हिंदुत्ववाद्यांच्या ट्रोलिंगपासून भारताच्या परराष्ट्रमंत्रीही सुरक्षित नसतील, तर मग बाकी कोण असेल?
मंत्रिमंडळातील एकही महत्त्वाचा नेता किंवा मोदींच्या मंत्रिमंडळातील इतर महिला मंत्री यांपैकी कुणीही स्वराज यांच्या बचावार्थ बोललेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा वेळी तत्परतेने आणि सार्वजनिकरीत्या या द्वेषाच्या आणि लैंगिक भेदाच्या भाषेचा निषेध का करत नाहीत? त्या पासपोर्ट प्रकरणातील तथ्य आणि सत्य काहीही असोत, स्वत:च्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांकडून अपेक्षित आदरालाही सुषमा स्वराज पात्र नाहीत का? .......